Home Video सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत आयव्हीएफ शिबिर

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत आयव्हीएफ शिबिर

40 second read
0
0
138

no images were found

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत आयव्हीएफ शिबिर

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-राष्ट्रीय वंध्यत्व निवारण जागरूकता सप्ताह निमित्त कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शिबिराचे उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉ. वर्षापातील यांनी दिली. 

      यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आपला भारत देश आज १.४५ अब्ज लोकसंख्येचा असूनही, भारताचा प्रजनन दर (Fertility Rate) सतत घसरत आहे, ही बाब चिंतेची आहे. भारताचा प्रजनन दर १९५० मध्ये ६.१८ होता, तो २०२१ मध्ये १.९ पर्यंत खाली गेला आहे. देशातील अंदाजे १०–१५% जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो आहे. सुमारे २७.५ दशलक्ष जोडप्यांना प्रजनन समस्यांचा त्रास आहे.  प्रजनन दर कमी होण्यामागील काही महत्त्वाची कारणे आहेत, ती म्हणजे , विवाह आणि पालकत्वात होणारा विलंब, जीवनशैलीतील बदल, मानसिक आरोग्य, ताणतणाव , पर्यावरणीय विषारी घटक  , वैद्यकीय अडचणी जसे की PCOS, कमी AMH, हार्मोनल असंतुलन  , दर ५ पैकी १ विवाहात प्रजनन समस्या असते, हे आकडेवारीतून स्पष्ट होते.

     लोकसंख्याशास्त्रज्ञांच्या मते, कमी प्रजनन दरामुळे वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. भारतातील २७ पैकी १७ राज्यांमध्ये रिप्लेसमेंट लेव्हल (२.१) पेक्षा कमी प्रजनन दर नोंदवला आहे. केरळने १९८८ मध्ये, तामिळनाडूने १९९३ मध्ये ही पातळी ओलांडली. आज कर्नाटकचा दर १.६, तामिळनाडूचा १.४ आणि आंध्र प्रदेशचा १.५ इतका खाली गेला आहे. 

      यावेळी बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासक, आयुक्त के मंजूलक्ष्मी म्हणाल्या, “वंधत्व ही समस्या लक्षात घेऊन, २० ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान राष्ट्रीय प्रजनन जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे. या निमित्ताने सिद्धगिरी जननी IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कोल्हापूर येथे जनजागृती आणि सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

        या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे गरजू व आर्थिक दृष्ट्या असक्षम जोडप्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देणे. या शिबिरामध्ये वरिष्ठ सल्लागार डॉ. वर्षा पाटील यांच्याकडून मोफत IVF सल्लामसलत, फक्त २०० रुपयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा, पुरुष व महिला वंध्यत्वासंबंधी समस्यांवर (कमी शुक्राणू, स्कॅन्टी पाळी, PCOS, Endometrium इ.) सविस्तर तपासणी व उपचार

या समस्यांवर उपाय म्हणजे – योग्य वयात विवाह व गर्भधारणा, संतुलित आहार, व्यसनमुक्ती, ताणतणावाचे व्यवस्थापन, स्वच्छता, व्यायाम व वेळेवर तज्ज्ञांशी संपर्क आदी बाबींचा समावेश असेल.

      सिद्धगिरी जननी सेंटरमध्ये आयव्हीएफ, आयसीएसआय यांसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतींबरोबरच आयुर्वेदिक उपचारांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जोडप्यांना त्यांच्या स्वप्नातील मूल मिळवण्यास मदत झाली आहे. ३९ ते ४४ वयोगटातील महिलांनाही येथे गर्भधारणा झाल्याची यशोगाथा आहे. याचा लाभ कोल्हापूर परिसरातील सर्व गरजू जोडप्यानी घ्यावा असे आवाहन यावेळी मुख्य प्रशासक के मंजुलाक्ष्मी यांनी केले.

      यावेळी प्रास्ताविक करताना विवेक सिद्ध म्हणाले, “संपूर्ण पारदर्शकता, तांत्रिक प्रगती व समर्पित सेवा या तत्त्वांवर सिद्धगिरी जननी कार्यरत आहे. परम पूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने हे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू आहे. या आठवड्यातील शिबिराचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक जोडप्यांनी घ्यावा व ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.” या पत्रकार परिषदेस कोल्हापूर महानगरपालिकेचे जन संपर्क अधिकारी महेश सूर्यवंशी, सिद्धगिरी जननीच्या अनुराधा शिंदे, अमित गावडे, कुमार चव्हाण, पुनीत मुचंडी, अमोल गराडे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…