Home मनोरंजन ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील मलायका बनली देसी गर्ल

‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील मलायका बनली देसी गर्ल

1 min read
0
0
19

no images were found

हप्‍पू की उलटन पलटन’मधील मलायका बनली देसी गर्ल

पहिल्‍यांदाच प्रेक्षकांना मी पूर्णत: देसी व मोहक लुकमध्‍ये पाहायला मिळणार आहे. एक माणूस तिला तिच्‍या मुलांप्रमाणे वर्तणूकीबाबत टिप्‍पणी करतो, ज्‍यामुळे ती खूप अस्‍वस्‍थ होते आणि स्‍वत:मधील महिलेची अदा व मोहकता दाखवण्‍याचे ठरवते. मलायकाचा आत्‍मविश्‍वास वाढण्‍यासाठी काटे (गझल सूद) तिचा मेकओव्‍हर करते आणि कमलेशला (संजय चौधरी) वेषांतर करून मलायकाला डेटवर घेऊन जाण्‍याची विनंती करते. पण ती त्‍याच्‍या प्रेमात पडते आणि कथानकाला रोमांचक वळण मिळते.

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’ विनोदी व मनोरंजनपूर्ण कथानकांच्या माध्‍यमातून प्रेक्षकांना हास्‍याचा डोस देत त्‍यांचे मनोरंजन करत आहे. मालिकेमधील पात्रं अनेकदा विनोदी स्थितीमध्‍ये सापडतात, तसेच नवीन लुक्‍स धारण करत प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करतात. मलायका (सोनल पनवार) देसी गर्ल बनली आहे, जे पाहून प्रेक्षक अचंबित होतील.

आपल्‍या नवीन लुकबाबत सांगताना मलायका ऊर्फ सोनल पनवार म्‍हणाल्‍या, ”मालिकेमधील माझी भूमिका टॉमबॉयसारखी आहे. तिला वारंवार तिची मोठी बहीण व भाऊ मानलेल्‍या मित्राच्‍या कृत्‍यांचा त्रास होतो. पण ती कमलेशची मस्‍करी देखील करते. ती सिंग कुटुंबामधील शांत व्‍यक्‍तींपैकी एक आहे. पण, यावेळी कथानक पाहून प्रेक्षक अचंबित होणार आहेत, कारण त्‍यांना मी पूर्णत: वेगळ्या लुकमध्‍ये पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री पुढे म्‍हणाल्‍या, ”आमच्‍या मालिकेमध्‍ये प्रेक्षकांना नेहमी काहीतरी रोचक व मनोरंजनपूर्ण कथानक पाहायला मिळते. मला विश्‍वास आहे की, हे कथानक देखील प्रेक्षकांना अचंबित करेल. मी या एपिसोडसाठी शूटिंग करताना खूप धमाल केली. माझी देसी गर्लची भूमिका साकारण्‍याची इच्‍छा होती. कॉस्‍चूम परिधान करण्‍यासह मेकअप करणे आणि आभूषणे परिधान करणे माझ्यासाठी नवीन अनुभव होता. मी पडद्यावर माझा ग्‍लॅमरस लुक दाखवण्‍यासाठी उत्‍सुक होते.

मला सांगावेसे वाटते की मी नृत्‍य, ड्रामा व ग्‍लॅमरस लुकचा छान आनंद घेतला. नेहमीच्‍या लुकच्‍या तुलनेत हे आनंददायी बदल होते. पण वास्‍तविक जीवनात माझे व्‍यक्तिमत्त्व मलायकासारखेच आहे. मला साड्या व सलवार कमीज परिधान करण्‍याची सवय नाही, ज्‍यामुळे पारंपारिक पेहराव करण्‍याचा अनुभव आव्‍हानात्‍मक व उत्‍साहवर्धक होता. गझल सूद (काटे सिंग) व संजय चौधरी (कमलेश) यांच्‍यासोबत माझे ग्रूमिंग आणि रोमँटिक डान्‍स सीक्‍वेन्‍स धमाल होते. बालपणी मला चित्रपट ‘प्रिन्‍सेस डायरीज’ खूप आवडायचा आणि या एपिसोडने मला राजकुमारी असण्‍याचा अनुभव दिला (हसते). मला नृत्‍य करायला आवडते आणि डान्‍स सीक्‍वेन्‍सेसचा समावेश असलेल्‍या कोणत्‍याही कथानकामधून मला खूप आनंद मिळतो. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझा देसी गर्ल लुक आवडेल.” 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…