Home Video अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

1 second read
0
0
139

no images were found

अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

जालना :- मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आले. आल्यावर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाचही मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. एका एका मागणीवर सविस्तर माहिती दिली. जरांगे पाटील यांनीही त्यांची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, अतूल सावेही होते. तर उपोषण स्थळी मंत्री संदीपान भुमरे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर आधीच पोहोचले होते.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी जालन्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सकाळी पावणे अकराच्या सुमारास जालन्यात पोहोचले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं. सक्तीच्या रजेवर पाठवणं हा त्यावरचा उपाय नाही. तसेच ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर ते अडून होते. त्यामुळेच त्यांचे उपोषण लांबले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…