Home देश-विदेश आदित्य एल १ ने पाठवला पहिला वहिला सेल्फी

आदित्य एल १ ने पाठवला पहिला वहिला सेल्फी

2 second read
0
0
21

no images were found

आदित्य एल १ ने पाठवला पहिला वहिला सेल्फी

देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर आता आदित्य L-1 उपग्रहाने पहिला सेल्फी इस्रोला पाठवला आहे. पृथ्वीपासून सूर्याच्या १२५ दिवसांच्या प्रवासातील हा पहिलाच फोटो अपडेट आहे. आदित्यने पाठवलेल्या सेल्फीमधून पृथ्वी व चंद्राचे फोटो पाहायला मिळत आहेत. ISRO ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून हा सुंदर क्षण जगाबरोबर शेअर केला आहे.

‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार आता आदित्य एल १ ची कक्षा बदलाचा दुसरा टप्पा ५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन वाजता पार पडला. याआधी पहिली पृथ्वी कक्षा परिभ्रमण मोहीम (ईबीएन 1) बंगळुरूच्या ‘आयएसटीआरएसी’येथून यशस्वीरित्या पार पडली. होती. शनिवारी २ सप्टेंबरला आदित्य एल- १ चे आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…