Home कौटुंबिक नैसर्गिक डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

14 second read
0
0
41

no images were found

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-डॉ. डी . वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण व रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. 

      ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  ‘प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ ही थीम निश्चित करण्यात आली होती.  यानिमित्त डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक विरोधी जनजागृती करून वृक्षारोपण करण्यात आले. 

       डॉ. पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणामध्ये झाडांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. सर्वानीच आपल्या घर किवा आजूबाजूच्या परिसरात किमान एक तरी झाड लावून ते जगवावे. निसर्गचक्र सुरळीत राखण्यासाठी झाडे लावणे व जगवणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह गार्डन स्टाफ सुरज राणे, दीपक करपे, बाबासो रानगे, विष्णू पिंगळे यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In नैसर्गिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …