no images were found
पिरामल फायनान्स ‘पारख’ आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी जिओ हॉटस्टार व सन एनएक्सटीवर उपलब्ध!
कोल्हापुर,: पारख या मालिकेत वास्तवाधारित आणि प्रेरणादायी कथा आहेत ज्यात ग्राहक त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करताना दिसतात. या मालिकेमुळे पिरामल फायनान्सचा आर्थिक समावेश आणि भारतातील व्यक्ती व लघु व्यवसायांना सक्षम करण्याचा संकल्प अधोरेखित होतो. आर्थिक जागरूकता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पिरामल फायनान्सने ही अनोखी मालिका तयार केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पारख लाँच करून, पिरामल फायनान्सने महाराष्ट्र आणि अन्य भागांतील अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवला आहे, जेणेकरून प्रेक्षकांना वेळेप्रमाणे व सोयीने ही मालिका पाहता येईल.
‘हम कागज़ से ज़्यादा नीयत देखते हैं’ या विश्वासावर आधारित पारख ही मालिका अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी आर्थिक प्रवासांची कहाणी सांगते, ज्यांनी योग्य मार्गदर्शनाने आपले आयुष्य बदलले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच झाल्याने ही मालिका महाराष्ट्रातील मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचेल, जिथे पिरामल फायनान्सने आधीपासूनच मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत.
या डॉक्युसीरीजमधील एक भाग महाराष्ट्रातील बलिराम पारदे यांच्या प्रवासावर आधारित आहे. त्यांची आर्थिक वाटचाल पिरामल फायनान्सच्या सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोनामुळे शक्य झाली. त्यांच्या कथेमधून, आर्थिक मदत मिळवताना सामान्य माणसाला येणाऱ्या अडचणी आणि माणूस केंद्रित दृष्टिकोन कसा प्रभावी ठरतो, हे अधोरेखित होते.
पारख सध्या जिओ हॉटस्टार आणि सन एनएक्सटी या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर लाइव्ह आहे. ही मालिका अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि आर्थिक समावेशाचा संदेश अधिक बळकट करत आहे.
पिरामल फायनान्सचे मार्केटिंग प्रमुख अरविंद अय्यर म्हणाले, “पारख ही केवळ मालिका नाही, तर ती आमच्या ग्राहकांना समजून घेण्याच्या व त्यांच्याशी अधिक खोलवर संबंध प्रस्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. यात आम्ही त्यांच्या कागदपत्रांपलीकडे पाहतो — त्यांची खरी नीयत आणि स्वप्न ओळखतो. या कथांमधून असे खरे लोक दिसतात जे संकटांवर मात करून आर्थिक सशक्ततेच्या दिशेने पहिले पाऊल उचलतात आणि आपली स्वप्ने साकार करतात.”
ते पुढे म्हणाले, “पारख जिओ हॉटस्टार आणि सन एनएक्सटी वर लाँच झाल्यामुळे ही प्रेरणादायी मालिका आता महाराष्ट्रासारख्या टियर 2 आणि टियर 3 मार्केट्समध्येही मोठ्या संख्येने पाहिली जाईल, जिथे ओटीटी दर्शकवर्ग झपाट्याने वाढत आहे. पारख ही मालिका कर्जवाटपाच्या पारंपरिक कल्पनांना नवा दृष्टिकोन देते – इथे व्यवहारांपेक्षा माणसांना सक्षम करण्यावर भर दिला जातो.”
लिंक: जिओ हॉटस्टार वर पारख सीजन1 भाग 3 पाहा आणि सन एनएक्सटी वर पिरामल फायनान्स – मराठी डॉक्युमेंटरी शो ऑनलाईन पाहा
महाराष्ट्र हे पिरामल फायनान्सच्या 5 प्रमुख मार्केट्सपैकी एक आहे, आणि कंपनीच्या रिटेल एयुएममध्ये याचे महत्त्वाचे योगदान आहे. पिरामल फायनान्सने महाराष्ट्रात 1,00,000 हून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. राज्यातील 43 शहरांमध्ये कंपनीची उपस्थिती असून 81 शाखा आहेत.
संपूर्ण भारतात 13,000 शहरांमध्येमध्ये 514 हून अधिक शाखांसह, पिरामल फायनान्स 4.4 दशलक्षांहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवत आहे. कंपनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांना आर्थिक साधनांनी सक्षम करत आहे. कंपनीकडे गृहकर्ज, लघु उद्योगांसाठी कर्ज, मालमत्तेवर आधारित कर्ज, जुन्या कारवर कर्ज व बिनतारण कर्ज यांचा समावेश असलेले विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ आहे, जे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील व्यक्ती व लघु उद्योगांसाठी उपयुक्त आहे.