Home शासकीय राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी सदिच्छा भेट घेतली

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी सदिच्छा भेट घेतली

15 second read
0
0
43

no images were found

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी सदिच्छा भेट घेतली

 

मुंबई,  : मुंबई भेटीवर आलेले जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारत व जपानचे सांस्कृतिकधार्मिक व राजकीय संबंध, जपान – भारत शैक्षणिक सहकार्य, पर्यटन, वस्त्रोद्योग, कृषीक्रीडाशिक्षणकौशल्य आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजीभारतातील जपान दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिरोजपान दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नोरिफुमीउप-वाणिज्य दूत निशियो रियो आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, भारतातील लोकांना जपानच्या लोकांची शिस्तबद्ध जीवनशैली फार आवडते. बौद्ध धर्मामुळे भारत व जपान मधील सांस्कृतिक संबंध घनिष्ट आहेत. हे संबंध आणखी वाढविण्यासाठी जपानने क्रीडा-विशेषतः व्हॉलीबॉल व टेबल टेनिसकृषी विज्ञान-विशेषतः मशरूम लागवड या क्षेत्रात राज्याला सहकार्य करावे.

वस्त्रोद्योग क्षेत्रात जपानने भारताला सहकार्य केले तर त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागांना होईल. या संदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडित  विक्रेता-ग्राहक परिषदेचे आयोजन केले जावे. वस्त्रोद्योगाव्यतिरिक्त रत्न व आभूषण तसेच हिरे व्यापार या क्षेत्रात देखील भारतीय उत्पादने जपानी नागरिकांच्या पसंतीस उतरतील. जपानमध्ये भारतीय विद्यार्थी कमी येण्याला तेथील भाषेची अडचण असल्याचे नमूद करून मुंबईसह इतर विद्यापीठांना जपानी भाषेचे वर्ग सुरु करण्याबद्दल राज्यपालांनी सूचित केले.  

जपानचे भारतातील राजदूत किची ओनो म्हणाले, भारत व जपानचे सांस्कृतिकधार्मिक व राजकीय संबंध अतिशय घनिष्ट आहेत. परंतुभारतातील युवकांना जपानच्या विद्यापीठांबद्दल फारशी माहिती नाही. भारतातून अवघे १६०० विद्यार्थी जपान येथे उच्च शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषांचे वर्ग सुरु करण्याच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

जपान-भारत शैक्षणिक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने यावर्षी हैदराबाद येथे विद्यापीठ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. चित्रपट तसेच अनिमेशन निर्मितीच्या माध्यमातून पर्यटनाला देखील चालना देता येईल. उभय देशांमधील लोक स्तरावर संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने जपान कौशल्य विकासमाहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे श्री.ओनो यांनी यावेळी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…