no images were found
फडणवीस यांनी जपान दौऱ्यात तकागी केई सेन यांची घेतली भेट
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकाबाहेरील विकास प्रकल्पांना आणि वर्सोवा-विरार सागरी सेतूला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी कडून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार असून भारतात एकावरच न थांबता आणखी बुलेट ट्रेन सुरु व्हाव्यात, अशी अपेक्षा फडणवीस यांनी जपानमधील टोकिओ येथे बोलताना व्यक्त केली.
फडणवीस यांनी बुधवारी जपानचे पायाभूत सुविधा आणि वाहतूक उपमंत्री निशिदा शोजी यांची भेट घेतली. बुलेट ट्रेन स्थानकाबाहेर होणाऱ्या विकास प्रकल्पांना जायकाच्या माध्यमातून वित्तसहाय्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मुंबई पारबंदर प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जात असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.