no images were found
एशियन पेंट्सच्या ‘स्मार्टकेअर हायड्रोलॉक एक्स्ट्रीम’सह वॉटरप्रूफिंगच्या स्तराला नव्या उंचीवर
स्मार्टकेअर हायड्रोलॉक एक्स्ट्रीमच्या रूपाने, ओलावा आणि भिंती फुलणे नाहीसे होण्याच्या पाच वर्षांच्या वॉरंटीसह, वापरण्यास सुलभ असे अंतर्गत वॉटरप्रूफिंग सोल्यूशन आल्यामुळे नवीन मापदंड स्थापित
मुंबई: पाणीगळतीला निरोप देण्याची वेळ आली आहे, कारण एशियन पेंट्सने ‘स्मार्टकेअर हायड्रोलॉक एक्स्ट्रीम‘ या उत्पादनाच्या माध्यमातून अंतर्गत वॉटरप्रूफिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ब्रॅण्ड अँबॅसडर्स रणबिर कपूर आणि पीव्ही सिंधू हे नवीन उत्पादन सर्वांपुढे आणत आहेत. अनेक उपयुक्त सुविधांनी युक्त असे हायड्रोलॉक एक्स्ट्रीम ओलावा, भिंती फुलणे (एफ्लोरेसन्स) अशा पाणीगळतीमुळे होणाऱ्या तीव्र समस्यांपासून अद्वितीय संरक्षण पुरवते. स्मार्टकेअर हायड्रोलॉक एक्स्ट्रीम हे एक ईझी-टू-अप्लाय अंतर्गत वॉटरप्रूफिंग सोल्यूशन असून, वॉटरप्रूफिंगसंदर्भातील सर्व गरजांची विनासायास पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आले आहे.
देशभरातील अत्यंत तीव्र स्वरूपाच्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, घरमालकांना ओलावा तसेच भिंती फुगणे यांसारख्या तीव्र स्वरूपाच्या वॉटरप्रूफिंगविषयक समस्यांवर सोयीस्कर व प्रभावी उपाय देण्याच्या उद्देशाने, एशियन पेंट्सने या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. प्लास्टर तोडणे व विस्तृत स्वरूपाचे गवंडीकाम करावे लागणाऱ्या पारंपरिक पद्धतींहून हा उपाय वेगळा आहे. हायड्रोलॉक एक्स्ट्रीम प्लास्टरच्या स्तरावरच थेट विना तोडफोड लावले जाऊ शकते.
स्मार्टकेअर हायड्रोलॉक एक्स्ट्रीम आर्द्रतेपासून अपवादात्मक दर्जाचे संरक्षण देऊ करते. त्यामुळे ९० टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेल्या थरांवरही ते लावले जाऊ शकते. आर्द्रतेला प्रतिरोध करण्याच्या उच्च दर्जाच्या क्षमतेमुळे उत्पादन अगदी आव्हानात्मक परिस्थितीतही उत्तम काम करते.
एशियन पेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंगले या उत्पादनाबद्दल व त्याच्या जाहिरातीबद्दल म्हणाले, “ग्राहकांना त्यांच्या घरांमध्ये तणावमुक्त राहण्यात मदत करणारी उत्पादने पुरवण्यास एशियन पेंट्स सर्वोच्च प्राधान्य देते. भिंतींचे वॉटरप्रूफिंग हे बरेच आव्हानात्मक आहे, कारण, यात बहुतेकदा मोडतोडीचा धोका पत्करावा लागतो ही बाब विस्तृत स्वरूपाचे बाजारपेठ संशोधन केल्यानंतर आमच्या लक्षात आली. त्यानंतर आम्ही अंतर्गत वॉटरप्रूफिंगचे भवितव्य म्हटले जाऊ शकेल असे ‘स्मार्टकेअर हायड्रोलॉक एक्स्ट्रीम’ हे उत्पादन प्रस्तुत केले याचा आम्हाला अभिमान वाटतो.