Home शैक्षणिक विद्यार्थ्यांत सर्व विषयांप्रती जिज्ञासा, आदरभाव आवश्यक: डॉ. नानासाहेब थोरात

विद्यार्थ्यांत सर्व विषयांप्रती जिज्ञासा, आदरभाव आवश्यक: डॉ. नानासाहेब थोरात

4 second read
0
0
27

no images were found

विद्यार्थ्यांत सर्व विषयांप्रती जिज्ञासा, आदरभाव आवश्यक: डॉ. नानासाहेब थोरात

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाचा दृष्टीकोन विकसित करण्यासाठी त्यांच्या मनात सर्व विषयांप्रती जिज्ञासा आणि आदरभाव निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मेरी क्युरी फेलो डॉ. नानासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षाच्या वतीने ‘मीट दि सायंटिस्ट’ या उपक्रमांतर्गत आज सकाळी डॉ. थोरात यांचे ‘आंतरविद्याशाखीय संशोधनातील जागतिक संधी व उपयोजन’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठातील एम.एस्सी.च्या पदवीपासून ते ऑक्सफर्ड विद्यापीठापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीमधील आंतरविद्याशाखीय ज्ञानाचे व उपयोजनाचे योगदान विषद करून डॉ. थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांनी आज ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेकडे अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहायला हवे. विज्ञान विषयांइतकेच तत्त्वज्ञान आणि सामाजिक शास्त्रांतील ज्ञान व संशोधनही महत्त्वाचे आहे. एका विषयामध्ये तज्ज्ञ होणे गरजेचे आहेच; पण, अन्य विषयही समजावून घेण्यास प्राधान्य द्यावे. अन्य विषयांतील संज्ञा, संकल्पना समजावून घेऊन त्यांची आपल्या विषयातील संज्ञा व संशोधनाशी सांगड घालता आली पाहिजे. त्यासाठी भरपूर वैविध्यपूर्ण वाचन करून ज्ञानसंपादन करायला हवे. संशोधनाच्या संधी शोधायला हव्यात. या सवयीतून प्रयोगशीलतेला अधिक चालना मिळण्यास मदत होते आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला बळ लाभते. त्यातून नवसंशोधन व नवनिर्मितीच्या शक्यता वृद्धिंगत होतात. यातून दर्जेदार मनुष्यबळ विकसित होण्यासही मदत होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…