Home शासकीय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

16 second read
0
0
16

no images were found

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

 

कोल्हापूर :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सर्वसाधारण सूचना मार्गदर्शन बैठक संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी दिलेल्या सूचना पुढील प्रमाणे-

निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 22 ऑक्टोबर 2024 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार), दुपारी 3 पर्यंत. नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक. 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार) सकाळी 11 वाजता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह वाटप दिनांक 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार) दुपारी 3 नंतर. मतदानाचा दिनांक 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार) (सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 23 नोव्हेंबर 2024 (सकाळी 8 पासून ते संपेपर्यंत)

नामनिर्देशन पत्र भरण्याकरीता सुचना:-

 (१) विधानसभा निवडणूकीकरिता विहीत नमुन्यातील (नमुना 2 ब) स्वतंत्र नामनिर्देशन पत्र भरणे आवश्यक आहे (२) एक व्यक्ती जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र सादर करु शकतो (३) नामनिर्देशन पत्रातील भाग एक ते भाग तीन अ मधील कोणताही रकाना निरंक ठेवू नये. निरंक असल्यास त्यामध्ये निरंक किंवा लागू नाही असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. (4) नामनिर्देशन पत्र उमेदवार स्वतः किंवा त्याचा सूचक दाखल करू शकतो. (5) नोंदणीकृत मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवाराला नामनिर्देशनासाठी एका सुचकाची आवश्यकता आहे. तसेच नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवाराला दहा सुचकांची आवश्यकता आहे (5 क) नामनिर्देशन पत्रातील भाग एक ते भाग तीन अ मध्ये आवश्यकतेनुसार संबंधित सर्व ठिकाणी उमेदवार व सूचक यांच्या स्वाक्षऱ्या/अंगठे असणे आवश्यक आहे. सर्व सूचक 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. त्यांची नावे मतदार यादीत आहेत किंवा नाही याची खात्री करावी (6) उमेदवार तसेच सूचक यांचा मतदार यादीतील मतदार यादी भाग क्रमांक व मतदार अ. क्र अचूक नोंदवावा (7) उमेदवार/ सूचक अशिक्षित असल्यास त्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर त्यांच्या ओळखपत्रासह व उमेदवारासह उपस्थित राहून नामनिर्देशन पत्रावर ते दाखल करतेवेळी अंगठा उमटवावा. (8) उमेदवार इतर विधानसभा मतदार संघातील असल्यास त्यांनी संबंधित मतदार संघातील मतदार यादीतील नाव असल्याच्या नोंदीची प्रमाणित प्रत सोबत जोडावी.   (9) उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे असणे आवश्यक आहे. (10) नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवाराला तीन चिन्हांची निवड करणे आवश्यक आहे.

अनामत रक्कम :-

(अ) सर्वसाधारण / अराखीव संवर्गातील व्यक्तिकरिता (रू. 10,000/-) दहा हजार रुपये फक्त (ब) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील व्यक्ति करिता (रु.5,000/-) पाच हजार रुपये फक्त (आ) नामनिर्देशन पत्र दाखल करणे अगोदर उमेदवाराने अनामत रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात रोख स्वरूपात भरणा करणे आवश्यक आहे. तसेच दाखल केलेल्या पहिल्या नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच्या नामनिर्देशन पत्रासोबत नव्याने अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

शपथपत्र :-

(नमुना 26) शपथपत्रात कोणत्याही रकान्यातील माहिती कोरी ठेवू नये किंवा “_” यासारखी चिन्हे नमूद न करता ज्या मुद्याकरीता माहिती निरंक असल्यास ‘निरंक’ किंवा मुद्दा लागू नसल्यास ‘लागू नाही’ किंवा माहित नसल्यास ‘माहिती नाही’ असे स्पष्टपणे नमूद करण्याची दक्षता घ्यावी. शपथपत्राचे प्रत्येक पानावर उमेदवार यांची स्वाक्षरी तसेच दोन पानांचे मध्यावर नोटरी यांचा शिक्का/सही असणे आवश्यक आहे. शपथ पत्रामध्ये कोणत्याही रकान्यातील माहिती न भरल्यास अथवा रिक्त ठेवल्यास नामनिर्देशन पत्र नाकारण्यात येईल, याची नोंद घ्यावी. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरतेवेळी शपथपत्राची एक जादा झेरॉक्स प्रतही द्यावी. तसेच एका उमेदवाराला चार नामनिर्देशन पत्र भरण्याची संधी असली तरी फक्त पहिल्या नामनिर्देशन पत्रासोबत मूळ प्रतिज्ञापत्र जोडावे. इतर नामनिर्देशन पत्रासोबत त्याची झेरॉक्स प्रतही चालेल.

नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाची कागदपत्रे :- 

(१) विहित नमुन्यातील (नमुना 26) सक्षम प्राधिकारी यांनी अभिसाक्षांकित केलेले (ग्रीन लेजर पेपर वरील) रक्कम रु 500/- चे स्टॅम्प पेपरवरील शपथपत्र (2) शासकीय निवासस्थानाचा वापर केला असल्यास मागील 10 वर्षातील वीज, पाणी, टेलिफोन व घरभाडे थकबाकी नसल्याबाबत प्रमाणपत्र (3) नमुना अ व ब (राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवारांसाठी) राजकीय पक्षांनी पुरस्कृत उमेदवाराने नमुना अ व ब शक्यतो नामनिर्देशन पत्रासोबत जोडावे.

अथवा दिनांक 29 ऑक्टोबर 2024  (नामनिर्देशन दाखल करण्याच्या पत्राच्या शेवटच्या तारखेला) दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. दोन्ही (नमुना अ व ब) हे मूळ शाईने स्वाक्षरी केलेले असणे आवश्यक आहे. त्याची झेरॉक्स प्रत, फॅक्स प्रत, ईमेल प्रत स्वीकृत केली  जाणार नाही (4) अनामत रक्कम भरल्याची पावती (5) मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार मधील नोंदणी अधिकारी यांचेकडील मतदार यादीची सत्यप्रत (जर उमेदवार 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाबाहेरील मतदार असल्यास) (6) पांढऱ्या किंवा फिकट पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील पुर्ण चेहरेपट्टी असलेले दोन स्टॅम्पसाईज (2cm X 2.5cm) छायाचित्र (Photograph) संबंधित फोटो काढताना युनिफॉर्म, टोपी, गडद रंगाचा चष्मा किंवा गॉगल वापरता येणार नाही. फोटो मागील तीन महिने कालावधीतील असणे आवश्यक आहे. फोटोच्या मागे संबंधित उमेदवार यांनी आपले नांव व स्वाक्षरी नमूद करणे आवश्यक आहे. सोबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

खर्चाची मर्यादा :- रु 40 लक्ष फक्त

 उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरण्याच्या किमान एक दिवस आधी निवडणूक खर्चाकरीता त्यांच्या स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. सदर बँक खाते हे उमेदवार यांचे वैयक्तिक किंवा उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या नावावर संयुक्त खाते उघडता येईल. त्याचा क्रमांक व पासबुकचे प्रथम नोंदीची पानाची छायांकित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत विहीत नमुन्यात लेखी पत्रासह सादर करणे आवश्यक आहे.

महत्वाची सूचना:-

(1) नामनिर्देशन पत्र भरताना कक्षात प्रवेशपात्र व्यक्ती- उमेदवार व चार व्यक्ती (एकूण पाच) (2) नामनिर्देशन पत्र भरताना जास्तीत जास्त तीन वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. (सदर सूचना हा प्राथमिक स्वरूपाच्या असून यासंदर्भात उमेदवाराने भारत निवडणूक आयोग यांच्या मार्फत निर्गमित सूचना व्यक्तिशः प्राप्त करून घेवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे).

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…