no images were found
मतदान करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रात यावे – हरिष धार्मिक
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित झाला असून 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ नामनिर्देशन पत्र भरण्याची कार्यवाही 22 ऑक्टोबर 2024 पासून करवीर उपविभागीय कार्यालय, कोल्हापूर येथे होणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया दिनांक 22 ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणार आहे. दिनांक 26 व 27 ऑक्टोबर 2024 रोजी शासकीय सुट्टी असल्याने सदर दिवशी नामनिर्देशन पत्र भरण्याची कारवाई होणार नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी 274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी करवीर हरिष धार्मिक यांनी दिली आहे.
नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक 4 नोव्हेंबर 2024 दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर जे उमेदवार कायम झाले आहेत त्यांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया उप विभागीय कार्यालय, करवीर, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क येथे होणार असून निवडणूकीसंदर्भातील पुढील सर्व कार्यवाही व्ही. टी. पाटील सभागृह राजारामपुरी येथे होणार आहे. या ठिकाणाहूनच पथकाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे आणि स्ट्रॉंग रूम ही तेथेच बनविण्यात आली आहे. तसेच मतमोजणी प्रक्रिया सुद्धा व्ही. टी. पाटील सभागृह राजारामपुरी येथेच होणार आहे अशी माहिती हरिष धार्मिक यांनी दिली.
श्री. धार्मिक पुढे म्हणाले, 274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मागील तीनही निवडणुकीत मतदानाचा वाढता आलेख आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत 74.97 टक्के, विधानसभा 2014 मध्ये 70.01 टक्के, विधानसभा 2009 मध्ये 69.20 टक्के तर लोकसभा 2024 मध्ये 70.25 टक्के लोकसभा 2019 मध्ये 70.57 टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे याही वेळी विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सर्व पात्र मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. मतदार संघात एकूण 354 मतदान केंद्र असून नवीन 26 मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. शहरी भागात 186 तर ग्रामीण भागात 168 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्राची स्थाने 127 आहेत. मतदार संघात 46 मतदान मार्ग आहे. सर्वात दूरचे मतदान केंद्र 343 ते 346 निगवे खालसा असून ते 29 कि.मी. आहे. मतदार संघात एकूण मतदार 3 लाख 68 हजार 999 आहेत. यामध्ये व्हीआयपी मतदार 61, सैन्य दलातील मततदार 508, 18 ते 19 वयोगटातील मतदार 10 हजार 54 आहेत. या मतदार संघात महसूली गावे- 37, महसुली मंडळ-5, ग्रामपंचायत- 35, जिल्हा परिषद गट – 5, पंचायत समिती गण- 10,कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग- 33 असल्याचे श्री. धार्मिक यांनी सांगितले.