Home सामाजिक वारणा धरणातून 541 क्युसेक विसर्ग

वारणा धरणातून 541 क्युसेक विसर्ग

1 min read
0
0
32

no images were found

वारणा धरणातून 541 क्युसेक विसर्ग

 

        कोल्हापूर : सकाळी 7 वाजेपर्यंत वारणा धरणातून 541 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

            पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.7 फूट, सुर्वे 13.10 फूट, रुई 40.3 फूट, इचलकरंजी 36.6 फूट, तेरवाड 35.9 फूट, शिरोळ 27.10 फूट, नृसिंहवाडी 27.9 फूट व राजापूर 13.3 फूट अशी आहे.

आजचा धरणातील पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आली आहे.

राधानगरी- 8.09 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.74 (3.471 टी. एम. सी), वारणा 30.12  (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 21.55 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.57 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.48 (2.516), कुंभी 2.52 (2.715 टी. एम. सी), पाटगांव 3.46 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.34 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.88 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.24 (1.560), जांबरे 0.73 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ  1.24 (1.240 टी. एम. सी ),  कोदे ल.पा. 0.21 (0.214 टी. एम. सी)

Load More Related Articles

Check Also

डीकेटीईच्या विशाल गरजे या विद्यार्थ्यांस अमेरिकेतील ओमनिसाकडून ४२ लाख सर्वोत्तम पॅकेजवरती निवड

डीकेटीईच्या विशाल गरजे या विद्यार्थ्यांस अमेरिकेतील ओमनिसाकडून ४२ लाख सर्वोत्तम पॅकेजवरती …