no images were found
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत शिलाफलकाचे अनावरण
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत आज जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने यांच्या हस्ते प्रतिभानगर येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विरांना महापालिकेच्यावतीने वंदन करुन पंचप्रण शपथ घेण्यात आली. हुतात्मा स्मारक येथील शिलाफलकावर शहरात हयात असलेले व दिवंगत स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या वीरांची नावे कोरली गेली आहेत. यानंतर वसुधा वंदन अंर्तगत प्रतिभानगर येथील वि.स. खांडेकर शाळेमध्ये अमृत वाटीका तयार करण्यात आली आहे. या वाटीकेमध्ये प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार, स्वातंत्र्य सैनिक, जवानांचे कुटुंबीय यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आला. या वाटिकेतील मातीला वंदन करुन मातीचा अमृत कलश तयार करण्यात येणार आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वणकुंद्रे यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत आडसूळ, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, प्रशासन अधिकारी एस.के.यादव, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, सतिष फप्पे, रमेश कांबळे, नगरसचिव सुनिल बिद्रे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबरे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपुत, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, राजसिंह शेळके, स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन विभागातील हायात व शहीद झालेल्या वीरांची कुटुंबीय व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.