no images were found
शहीद जवान व त्यांच्या 73 वारस कुटुंबियांचा महापालिकेच्यावतीने सत्कार
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने हयात स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या 73 कुटुंबियांचा प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम प्रतिभानगर येथील प्रतिभानगर सोसायटी हॉलमध्ये घेण्यात आला.
यामध्ये जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने यांच्यासह दिवंगत स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या 73 कुटुंबियांना कोल्हापूरी फेटे, शाल,श्रीफळ, रोप वाटिका देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्यावतीन सकाळी हयात व स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन दलामध्ये शहीद झालेल्या कुटुंबियांना घेऊन येण्यासाठी चारीही विभागीय कार्यालया अंतर्गत के.एम.टी. बसची स्वतंत्र व्यवथा करण्यात आली होती. प्रतिभानगर हॉल येथील कार्यक्रमात टेंबलाईवाडी विद्यामंदिरच्या विद्यार्थीनींनी देशपर गितावर नृत्य सादर केले. यामध्ये ये मेरे वतनके लोगो या गाण्यावर सर्वांनी दात दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वणकुंद्रे यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत आडसूळ, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, प्रशासन अधिकारी एस.के.यादव, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, सतिष फप्पे, रमेश कांबळे, नगरसचिव सुनिल बिद्रे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबरे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपुत, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, राजसिंह शेळके, स्वातंत्र्य सैनिक, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस, अग्निशमन विभागातील हायात व शहीद झालेल्या वीरांची कुटुंबीय व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.