Home शासकीय नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

50 second read
0
0
29

no images were found

नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  

                  मुंबई : मुद्रांक शुल्क अधिभार अनुदानाकरिता या वर्षी  १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीमधून नगरपरिषद व नगरपंचायतींना अनुदान वितरित करण्यात येणार आहे. नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत एक महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

            नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यातील नगरपरिषदानगरपंचायत क्षेत्रांमध्ये मालमत्तेच्या हस्तांतरणाकरिता राज्य शासनाकडून आकारण्यात आलेल्या  टक्का मुद्रांक शुल्क अधिभार रक्कमेएवढे सहायक अनुदान नगरपालिकांना देण्याची तरतूद आहे. नगरपरिषदांना सन २०१८-१९ च्या मुद्रांक शुल्क अधिभाराच्या थकित अनुदानापोटी 70 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. तसेचउर्वरित थकित मुद्रांक शुल्क अनुदानाची आकडेवारी प्रमाणित करुन घेण्याची कार्यवाही सुरू असून त्यानंतर आवश्यक निधीची तरतूद करुन हे थकीत अनुदान टप्या-टप्याने देण्यात येईल.

            मुद्रांक शुल्क अनुदानापैकी एक टक्का रक्कम नगरपालिकेला थेट अनुदान म्हणून मिळण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख यांनी सहभाग घेतला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

नैसर्गिकरित्‍या रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध्‍ये समाविष्‍ट केले पाहिजेत असे खाद्यपदार्थ

नैसर्गिकरित्‍या रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध् …