no images were found
अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार, मंत्रीमंडळ बैठकित निर्णय
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. कोविड प्रतिबंधक लसीची बूस्टर मात्रा देण्याची मोहीम अधिक वेगाने राबविणे, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबविणे, अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार नागरी सुविधा पुरविणे आदी निर्णय या वेळी घेण्यात आले.
राज्यातील कोरोना रूग्णसंख्या जरी आटोक्यात आहे. मात्र, अनेक जणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेला नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसीची बूस्टर मात्रा देण्याची मोहीम अधिक वेगाने राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली, तरी गाफील न राहता लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवापंधरवडा राबविणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण अवलंबणे
नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यताही आज पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.