no images were found
शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सने गाठला 60 हजारांचा टप्पा
मुंबई : शेअर बाजारात आज दिवसभर तेजी दिसून आली. सेन्सेक्सने बाजार सुरू होताच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. आजही शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 322 अंकांच्या तेजीसह स्थिरावला तर निफ्टीमध्ये 103 अंकांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये आज 0.54 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,115 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.58 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,936 अंकांवर स्थिरावला आहे.
आठवड्याचा पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात असलेला खरेदीचा जोर आज या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 240 अंकांच्या तेजीत असून निफ्टी 74 अंकांवर गेला आहे. सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 60,000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्समध्ये आज 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,204 अंकांवर सुरू झाला होता. तर निफ्टीमध्ये 0.68 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,957 अंकांवर सुरू झाला होता.