Home शासकीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लिंक नसलेल्या लाभार्थ्यांचे 14 ऑगस्टपूर्वी आधार लिंक करा –  अमोल येडगे 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लिंक नसलेल्या लाभार्थ्यांचे 14 ऑगस्टपूर्वी आधार लिंक करा –  अमोल येडगे 

2 second read
0
0
23

no images were found

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लिंक नसलेल्या लाभार्थ्यांचे 14 ऑगस्टपूर्वी आधार लिंक करा –  अमोल येडगे 

 

कोल्हापूर : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण 26 हजार 708 महिला लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग झालेले नसून याची गाव निहाय यादी प्रत्येक गावामध्ये लावलेली आहे. जिल्ह्यातील ज्या गावातील व शहरातील लाभार्थ्यांचे आधार लिंक राहिलेले आहे त्यांनी तात्काळ दि. 14 ऑगस्ट 2024 पूर्वी आधार लिंक करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

  जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील सर्व बँक प्रमुखांची आधार लिंक करण्याबाबत बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील आधार लिंक नसलेल्या महिला लाभार्थ्यांचे अकाउंट लिंक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक प्रतिनिधींना दिल्या. याप्रमाणे सर्व बँक प्रतिनिधींनी आधार लिंक करण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …