
no images were found
श्रीहरी कळला तर आयुष्य सार्थकी – मयूर गुरूजी
कोल्हापूर – श्रीहरी कळला तर आयुष्य सार्थकी लागेल, असे प्रतिपादन मयूर कुलकर्णी गुरुजी यांनी आज केले.
व्हीनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात सुरू असलेल्या श्री भागवत सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी निरुपणात त्यांनी माया आणि संसाराची नश्वरता, भक्ती आणि नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट करून यातूनच आपले समाज उत्थान आणि धर्म जागृतीचे कार्य अविरतपणे सुरू असल्याचे सांगितले.
याचबरोबर वराह अवतारातील कर्मयोगाचे महत्त्व, कर्दमऋषी कथेतून मानवेतेचे महत्त्व, सांख्ययोगातून अध्यात्माचे महत्त्व, धृव चरित्रातून भावजागृती, उपयोग आणि भक्तिमार्ग स्पष्ट केला. पुरंजन उपाख्यान आणि जडभरत कथा यातून प्रतिकात्मक संदेश स्पष्ट केला. प्रवचनाच्या माध्यमातून आत्मकल्याण, समाजकल्याण, राष्ट्रहिताच्या अनेक सुंदर दृष्टांतातून समाज जागृतीचा प्रयत्न केला. यावेळी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. या निमित्ताने मंदिराची आकर्षक सजावट करण्यासह विद्युत रोषणाईने मंदिर उजळले आहे.