no images were found
‘राष्ट्रवादी एनडीएचा अविभाज्य घटक, भविष्यात एकत्र काम करू’: प्रफुल्ल पटेल
एनडीएच्या ३८ घटक पक्षांची राजधानी दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
‘राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा अविभाज्य भाग आहे. राष्ट्रवादी पक्ष भविष्यात एनडीएसोबत काम करेल,’ असा दावा अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत एनडीएच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.
तर दुसरीकडे बंगळूर येथे भाजपविरोधात एकत्र आलेल्या २६ विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता विरोधी आघाडी ‘इंडिया’ सोबत राहणार की एनडीएमध्ये सामील होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाला प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिले.
बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘मी आणि अजित पवार आज एनडीएच्या बैठकीला इतर राजकीय पक्षांसोबत उपस्थित होतो.