no images were found
तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे शाहांचे आदेश
दिल्लीत काल भाजपप्रणित एनडीएची बैठक झाली. या बैठकीनंतर एक वेगळा घटनाक्रम दिसून आला .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीतच होते. त्यांना रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली.या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.
या बैठकीत राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याची माहिती आहे. तसंच तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे आदेश देखील दिल्याची माहिती समोर येत आहे.