no images were found
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत कराड मध्ये 19 जुलै रोजी कार्यशाळ
कोल्हापूर : शेतकरी उत्पादक कंपन्या व मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना EOI जाहिरात प्रसिध्दी पासून ते लाभार्थ्यांबरोबर करावयाच्या ग्रँट एग्रीमेंट पर्यंतची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर विभागातील सर्व सबंधित घटकांसाठी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवार दि. 19 जुलै 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून कोल्हापूर विभागातील सर्व लाभार्थी घटकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे मॅग्नेट प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.
मॅग्नेट प्रकल्पातील मॅचिंग ग्रँट घटकांतर्गत मूल्य साखळीत अंतर्भूत असलेल्या काढणी पश्चात हाताळणी व व्यवस्थापन, मूल्यवृद्धी, प्रक्रिया, विपणन आदी सुविधांच्या उपप्रकल्पांना 60 टक्के पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्याची EOI 3 जाहिरात दि. 11 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कार्यशाळेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असणारे लाभार्थी, लाभार्थी पात्रतेचे निकष, अनुदानासाठी पात्र उपप्रकल्पांचे घटक तसेच अपात्र घटक, उप प्रकल्पासाठीच्या इतर अटी व शर्ती, लाभार्थ्याने करावयाची नोंदणी, भरावयाच्या विहित नमुन्यातील अर्ज, अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी, सुधारित मूल्यांकन, निकष विविध प्रपत्रे इत्यादी घटकाचा समावेश असेल. या कार्यशाळेत मॅग्नेट प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. अमोल यादव, डॉ. सुभाष एस. घुले, विजय जगताप, बँक ऑफ इंडिया आणि समउन्नतीचे अधिकारी मार्गदर्शन करणार असल्याचेही डॉ. घुले यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.