no images were found
आरझू ने आज आपली फिनटेक सेवा आरझू प्रो फायनान्स लाँच ची केली घोषणा
कोल्हापूर : कंझ्युमर ड्युरेबल रिटेलर्सच्या व्यवसायांना वाढवण्याच्या आणि त्यांना त्यांचे व्यवसाय नव्या उंचीवर घेऊन जाण्यास स्पर्धा करण्यामध्ये सक्षम करण्याच्या प्रयत्नासह आरझू या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या बी२बी रिटेल टेक व्यासपीठाने आज आपली फिनटेक सेवा आरझू प्रो फायनान्स (Arzooo Pro Finance)च्या लाँचची घोषणा केली आहे. कंपनीची नवीन फिनटेक सेवा प्रो फायनान्स ऑफलाइन रिटेलर्सना सामना कराव्या लागणाऱ्या दोन प्रचलित समस्यांचे निराकरण करते, या दोन समस्या आहेत स्टोअरमधील विक्रीमध्ये वाढ आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षी ग्राहकांना उच्च मूल्य असलेल्या उत्पादनांची विक्री करणे.
आरझूचा डिजिटल-केंद्रित दृष्टिकोन उच्च मूल्याच्या ग्राहकोपयोगी व्यवसायांमध्ये ऑफलाइन रिटेलर्सच्या विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्या मर्यादांना दूर करत आहे. पेमेंट्स, कंझ्युमर फायनान्स व बँक-नेतृत्वित ऑफर्सचा समावेश असलेल्या आपल्या नाविन्यपूर्ण चेकआऊट सोल्यूशन्सच्या माध्यमातून आरझू या रिटेलर्सना आव्हानांवर मात करत त्यांच्या व्यवसायांचा विस्तार करण्यास सक्षम करते.
या विकासाबाबत अधिक माहिती देत आरझूचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) खुशनूद खान म्हणाले, आम्हाला ऑफलाइन रिटेलसाठी अत्याधुनिक चेकआऊट सोल्यूशन सादर करण्याचा आनंद होत आहे. हे सोल्यूशन स्टोअरला प्रबळ फायनान्शियल टूलमध्ये बदलते, तसेच रिटेलर्सना ग्राहक फायनान्स देण्यास व विविध पद्धतींच्या माध्यमातून प्रभावीपणे पेमेंट्स स्वीकारण्यास सक्षम करते. रिटेलर्सना सक्षम करण्यासोबत आरझूचे प्रो फायनान्स न्यू-टू-क्रेडिट ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करते, त्यांना त्यांची जीवनशैली अपग्रेड करण्यासाठी सर्वोत्तम फायनान्शियल उपलब्ध करून देत आर्थिक समावेशनाला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे.
आरझू प्रो फायनान्स उच्च मूल्य रिटेल विभागाला ग्राहकोपयोगी फायनान्सिंग, पेमेंट्स अशा सेवा वाढवण्यास मदत करते. क्रेडिट कार्डस्, डेबिट कार्डस्, नेट बँकिंग, यूपीआय इत्यादी सारखे विविध पेमेंट पर्याय देणारे चेकआऊट सोल्यूशन एनटीसी (न्यू टू क्रेडिट) असलेल्यांसह रिटेल खरेदीदारांना त्वरित ग्राहक फायनान्स देखील देते.
आरझूने आपल्या चेकआऊट सोल्यूशन प्रो फायनान्समध्ये समाविष्ट असलेल्या ऑफलाइन रिटेलकरिता बँक नेतृत्वित ग्राहक ऑफर्स देण्याकरिता विविध आघाडीच्या बँकांसोबत देखील सहयोग केला आहे. ज्यामुळे ऑफलाइन ग्राहकांना देखील अव्वल बँकांकडून विशेष बँक ऑफर्सचा लाभ घेता येईल. आरझूची प्रो फायनान्स सबस्क्रिप्शन-आधारित सेवा आहे, जेथे रिटेलर्स वार्षिक प्लान्समधून निवड करू शकतात. आरझूचे प्रो फायनान्स गुगल प्ले स्टोअर व अॅप स्टोअरच्या माध्यमातून आरझूवर सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध आहे, ज्यामुळे ते सर्वांसाठी सहजपणे उपलब्ध आहे.