Home शैक्षणिक शिवाजी विद्याीठ व भारतीय भूचुंबकत्व संस्था मुंबई यांच्यातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण

शिवाजी विद्याीठ व भारतीय भूचुंबकत्व संस्था मुंबई यांच्यातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण

16 second read
0
0
19

no images were found

शिवाजी विद्याीठ व भारतीय भूचुंबकत्व संस्था मुंबई यांच्यातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण

 
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील भौतिक शास्त्र अधिविभाग आणि भारतीय भूचुंबकत्व संस्था, मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. भारतीय भूचुंबकत्व संस्था (IIG) ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संशोधन संस्था असून भूचुंबकत्व, भूभौतिकी, वायुमंडलीय भौतिकशास्त्र, अवकाश भौतिकशास्त्र, तसेच प्लाझ्मा भौतिकशास्त्रातील मुलभूत आणि उपयोजित गोष्टीमध्ये संशोधन करते. IIG आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातील पहिला वैज्ञानिक सामंजस्य करार मे-1991 रोजी करण्यात आला होता. दर पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण केले जाते आणि ते आजपर्यंत चालू आहे. IIG आणि शिवाजी विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी पृथ्वी विज्ञान आणि अवकाश संशोधन होते. त्यामुळे या सामंजस्य कराराचा उद्देश परस्पर संमतीने सुविधांची देवाणघेवाण करणे, विद्यार्थ्यांना अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान क्षेत्रात संशोधनासाठी प्रशिक्षण देवून सक्षम करणे आणि संशोधनासाठी प्रवृत्त करणे तसेच या क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाची आणि कौशल्याची देवाणघेवाण करणे हा आहे.
याआधी 1989 मध्ये विद्यापीठ परिसरात IIG कडून MF RADAR स्थापित करण्यात आले. अशा प्रकारच्या अभ्यासाठी कोल्हापूर चे भौगोलिक स्थान हे अतिशय उपयुक्त आहे. हे कमी अक्षांश स्टेशन आहे, जे भारतीय द्वीपकल्पाच्या  विषुववृत्तीय प्रदेशात आयनोस्फियरमध्येविकसित होणाऱ्या प्लाझ्मा बबलच्या अभ्यासासाठी कोल्हापूर स्टेशन महत्त्वाचे आहे .   त्यामुळे या सुवेधेद्वारे सिंटिलेशन, टिल्टिंग फिल्टर फोटोमीटर आणि पोलारी मीटर प्रयोग वापरून आयनोस्फेरिक सिंटिलेशन, इक्वेटोरियल प्लाझ्मा बबल्स आणि एकूण इलेक्ट्रॉन धारणशक्ती मोजण्याचे प्रयोग सुरू केले गेले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील भौतिकशास्त्र विभागातील आयआयजीच्या नाईट एअरग्लो प्रयोगशाळेत हे प्रयोग स्थापित करण्यात आले.
 या सामंजस्य करारामुळे IIG आणि कोल्हापूर सुविधेचे शास्त्रज्ञ, तसेच विद्यापीठ आणि त्याच्या संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात परस्पर हितसंबंध असलेल्या अनेक विषयांवर संवाद साधण्यास अजून मदत होईल. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले. त्यांनी IIG चे डायरेक्टर प्रा. डिमरी यांना विद्यापीठाला भेट देण्यासाठी निमंत्रण दिले. तसेच हा करार केवळ कागदोपत्री न राहता त्याची दोन्हीकडून पुरेपूर अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी IIG कडून संचालक प्रा. ए.पी.डिमरी, प्रा. एस. गुरुबरन, एपीसीचे अध्यक्ष प्रा. सत्यवीर सिंग, डॉ. गोपी सीमाला, कुलसचिव श्री. आशुतोष शुक्ला, आणि डॉ. भारती काकड तर शिवाजी विद्यापीठाकडून प्रा. आर. जी. सोनकवडे आणि डॉ. आर. एस. व्हटकर उपस्थित होते
 
 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…