
no images were found
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी साथ सोडली…उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिला धक्का
मुंबई :- “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे काल (2 जुलै) राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होतं. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना पहिला धक्का बसला आहे. कारण शपथविधीला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे.