
no images were found
करवीर पीठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आज कार्यक्रम
कोल्हापूर – येथील शंकराचार्य करवीर पीठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी दिली.
ते म्हणाले, उद्या सकाळी नऊ वाजता विधींना सुरवात होऊन व्रताचे धारण, पादुका पूजन, प्रसाद असे दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याच्याशिवायय स्वामीजींचा चातुर्मास यावेळी पीठातच आहे. त्याचाही लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहनही श्री. भेंडे यांनी केले.