Home राजकीय भाजप सरकारने महिलांना स्वावलंबी करून सक्षम बनवले, खासदार धनंजय महाडिक 

भाजप सरकारने महिलांना स्वावलंबी करून सक्षम बनवले, खासदार धनंजय महाडिक 

1 second read
0
0
21

no images were found

भाजप सरकारने महिलांना स्वावलंबी करून सक्षम बनवले, खासदार धनंजय महाडिक 

कोल्हापूर (प्रतिनिधी):भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. तसेच मुरगूड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. मुरगूड येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

कागल तालुयातील मुरगुडमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या आघाडीच्या उमेदवारांची जाहीर सभा झाली. सभेला मोठ्या संख्येने मतदारांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तर भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असून, विकास हाच राज्यातील भाजप सरकारचा प्रमुख अजेंडा आहे. मुरगूडमधील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शहर सौंदर्यीकरण याच्यासह सर्वांगीण विकासाला गती देणार आहोत. त्यामुळे मुरगूड शहराच्या विकासाची चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे नेते प्रवीणसिंह पाटील, सुहासिनी पाटील, आघाडीचे नेते वीरेंद्र मंडलिक, महेश जाधव, नामदेवराव मेंडके, प्रकाश गोधडे, दिग्विजय पाटील, जयसिंग भोसले, भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…