Home राजकीय अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल

अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल

0 second read
0
0
105

no images were found

अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल

मुंबई : अनिल देशमुख हे सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत, ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात आले आहे. अनिल देशमुख आज अर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने व त्रास जास्त असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढला आहे व ईसीजी दोष आढळला असून तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच त्रास होत असल्याने त्यांना सुरुवातीला जेजे रुग्णालयात व नंतर KEM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी अकरा वाजता अनिल देशमुख आज अर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले.

कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्थर रोडचे अधिकारी आणि वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली त नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा रक्तदाब जास्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना अजून जेजे रुग्णालयात दोन ते तीन दिवस ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…