no images were found
गडकरी यांच्या वक्तव्यामुळे वाहनचालकांना दिलासा
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. तंत्रज्ञान आणि ग्रीन फ्युएल अर्थात हरित इंधनात झपाट्याने बदल होत असल्यामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल्सची किंमत कमी होईल. यामुळेच पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबर असतील,’ असं गडकरी यांनी सांगितलं. गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर कार आणि दुचाकीस्वार चांगलेच खूश झाले आहेत.
‘येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांइतक्या होतील,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केलं. ‘भारतात येणारा काळ हा इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आहे,’ असं देखील गडकरी यांनी यावेळी वक्तव्य केले. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे सरकार आणि नागरिक इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहेत; पण किमती जास्त असल्याने नागरिक ही वाहनं खरेदी करू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे नागरिकांत उत्साहाचे वातावरण हे वक्तव्य जर प्रत्यक्षात आले तर येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल नक्कीच वाढण्याची शक्यता आहे.