no images were found
‘बटेंगे तो कटेंगे’वरून महायुतीत जुंपली?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वादंग उठला आहे. त्यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर आदित्यनाथ यांच्यावर टीका सुरू झाली. मात्र भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी देखील योगींचा हा नारा उचलून धरला आहे. तर, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मात्र स्पष्ट केलं आहे ते या घोषणेशी सहमत नाहीत. त्यापाठोपाठ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचं नमूद केलं. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा दिला. मात्र, या दोन घोषणांमुळे महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.