no images were found
आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन,मेघाराणी जाधव यांचे विरुध्द गुन्ह्याची नोंद
कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 275 करवीर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत गारीवडे, ता. गगनबावडा ग्रामपंचायत सार्वजनिक जागेत आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्रीमती. मेघाराणी जाधव, रा. निवडे, ता. गगनबाबडा यांनी भाषणामध्ये महिला मतदारांना धमकी वजा इशारा दिला असलेने भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 171 अन्वये आदर्श आचारसंहितेचे त्यांनी उल्लघंन केलेले आहे.
श्रीमती. मेघाराणी जाधव, रा. निवडे, ता. गगनबाबडा यांचे विरुध्द गुन्हा नोंद करणे बाबत श्री. उदय पाटील, पथक प्रमुख, भरारी पथक क्र. 1 तथा कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी कार्यालय, पन्हाळा यांना निवडणूक निर्णय अधिकारी, करवीर कार्यालयाकडील दिनांक 14/11/2024 रोजीचे पत्रान्वये प्राधिकृत केलेले होते. त्यानुसार मेघाराणी जाधव, रा. निवडे, ता. गगनबाबडा यांचेवर आचारसंहिता भंग केलेबाबत दिनांक 14/11/2024 रोजी गगनबावडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तरी 275 करवीर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी, 275 करवीर विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.