no images were found
आणखी एक बडा नेता अजितदादांच्या गटात
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली फूट रोखण्याचं मोठं आव्हान आता शरद पवारांसमोर आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना पक्षाचे नवे प्रतोद आणि विरोधी पक्षनेते म्हणून निवडण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर आव्हाडांना मोठा धक्का बसला आहे.विरोधी पक्षनेते म्हणून आव्हाडांचं नाव घोषित होताच माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा प्रमुख आनंद परांजपे अजित पवारांच्या गटात सामील झाले आहेत. आनंद परांजपे यांनी थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर हजेरी लावली.
शरद पवारांचं पुण्यात शक्तिप्रदर्शन दरम्यान अजित पवार यांनी 8 नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.