no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या रेवा भागवतला मेटा – एक्स रॉसकडून ४ लाखाची फेलोशिप
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची तृतीय वर्ष आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागाची विद्यार्थिनी रेवा भागवत हिला मेटा (फेसबुक) – एक्स रॉसकडून (XROS) कडून तब्बल ४ लाखाची फेलोशिप ऑफर मिळाली आहे.
व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगुमेंटेड रिअॅलिटी या क्षेत्रात काम करण्यासाठी भारतातील १०० निवडक विद्यार्थ्यांना एक्स-रॉसकडून फेलोशिप दिली जाते. या फेलोशिप साठी रेवाची निवड झाली असून आभासी (VR) आणि संवर्धित वास्तव (AR) ह्या क्षेत्रात मध्ये तिने ३ महिने या प्रोजेक्टवर काम केले आहे.
महाविद्यालयातील आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागातर्फे विद्यार्थ्यासाठी एआर आणि व्हीआर मधील नवनवीन उपक्रम रिस्कील अंतर्गत आयोजित केले जातात. त्याचबरोबर ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागातर्फे दरवर्षी विविध विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी होतो.
रेवाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी तिचे अभिनंदन केले. या यशामध्ये तिला महाविद्यालयाचे कॅम्पस ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग मकरंद काइंगडे, विभाग प्रमुख प्रा. शताक्षी कोकाटे व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन मिळाले.