no images were found
100 टक्के इथेनॉलवर चालणारी नवीन वाहने ऑगस्टमध्ये येणार :- महामार्ग मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली :- ऑगस्टपासून मी इथेनॉलवर 100 टक्के चालणारी वाहने बाजारात आणणार आहे. बजाज, TVS आणि Hero या कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत. या सर्व ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महामार्ग मंत्री नितीन गडकरी केली आहे.
सध्या 60 टक्के पेट्रोल आणि 40 टक्के इलेक्ट्रिक मिडीयमवर चालणारी टोयोटाची केमरी कार लवकरच 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेवर चालणारी वाहने बाजारात आणणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
देशाच्या वाहतूक क्षेत्रात इथेनॉल ही नवी क्रांती असल्याचे सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त इंधन असेल. हे शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचे असणार आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यात येणार असून याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
या माध्यमातून पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्वही संपुष्टात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनीही हायड्रोजनवर चालणाऱ्या कार लॉन्च करण्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा देशातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी गडकरी यांनी सांगितलं आहे.