Home क्राईम सुशांत सिंग राजपूत प्रकरणी  देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी  देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा

0 second read
0
0
37

no images were found

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी  देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा बॉलिवूडचा अत्यंत लोकप्रिय कलाकार होता. 14 जून 2020 रोजी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं बांद्राच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आकस्मिक मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसला होता. गेली तीन वर्षे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचे विविध कांगोरे समोर येत आहेत.

या घटनेनंतर बॉलिवूडचे चित्रच पालटले. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नावं या प्रकरणातून समोर आले होते. त्यानंतर अनेकांची नावंही या प्रकरणातून समोर आलेली होती. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळणं मिळाले. सुशांतच्या केसनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणही बाहेर आले होते. त्यामुळे हा काळ बॉलिवूडसाठी अटीतटीचा होता.

त्यानंतर सीबीआयनं या घटनेकडे अगदी गांभीर्यानं पाहत या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला असून आता याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एक मोठी अपडेट समोर आणली आहे. ”यापुर्वी जी माहिती या केसच्या संदर्भात उपलब्ध होती ती ऐकीव माहितीच्या आधारे समोर आली होती. त्यानंतर काही लोकांनी असेही सांगितले की या केसच्या संदर्भात त्यांच्याजवळ ठोस पुरावेही आहेत. आम्ही त्या लोकांशी बोलणी केली असून आता आम्ही ते सर्व पुरावे पोलिसांकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे.

तरीही जेवढे पुरावे सध्या उपलब्ध आहेत त्यानूसार त्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे की ते पुरावे खरे आहेत की खोटे. या पुराव्यांची पडताळणी सुरू असल्यानं आता मी यावर काही बोलणं योग्य होणार नाही.”

देवेंद्र फडणवीसांच्या या मुलाखतीनंतर या केसचे पुढे काय होणार याबद्दल कदाचित आणखीनं माहिती मिळू शकेल परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून यासंदर्भातील पुरावेही ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडून ते पोलिसांपर्यंत पोहचवण्यास सांगितले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…