no images were found
विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी आकाश कदम यूपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्विस(IFoS) ऑल इंडिया रँक 76 क्रमांकावर उत्तीर्ण
कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्विस (IFoS) च्या निकालातून विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी आकाश कदम याने ऑल इंडिया रँक 76 या क्रमांकावर बाजी मारली आहे.
मूळचा सातारचा असणारा आकाश हा विद्या प्रबोधिनी तर्फे देण्यात येणाऱ्या मा.नाम.चंद्रकांत (दादा) पाटील स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीचा विद्यार्थी असून यूपीएससीने घेतलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्विस परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात तो उत्तीर्ण ठरला आहे.
भारतीय वन सेवा ही आयएएस व आयपीएस सह मात्र तिसरी ऑल इंडिया सर्व्हिस असून भारतातील वन संरक्षण आणि संवर्धन व वन कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्वात महत्वाची सेवा मानली जाते.
यूपीएससी ने घेतलेल्या मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यांवर तब्बल 28 विद्यार्थ्याना प्रबोधिनीने शिष्यवृत्ती देऊ केली होती.
पैकी याआधी जाहीर झालेल्या नागरी सेवा परीक्षांमधून चार विद्यार्थ्यांनी तर आता जाहीर झालेल्या वनसेवा परीक्षेतून एका विद्यार्थ्यांने यश संपादन केले आहे. विद्या प्रबोधिनीचे संचालक श्री राजकुमार पाटील यांनी प्रबोधनीच्या शिष्यवृत्तीचे या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने सार्थक केल्याचे सांगितले. सदर शिष्यवृत्ती 2024-25 करता देखील देण्यात येणार असून युपीएससी ची पूर्व परीक्षा झाल्यानंतर यासाठी विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.