no images were found
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
कोल्हापूर : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार असल्याचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी कळविले आहे.
ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै 2024 रोजी 18 वर्षा पेक्षा कमी आहे व ज्या मुलांचे शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केले आहे. त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहनही श्री. वाईंगडे यांनी केले आहे.