no images were found
गगनबावडा येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरु
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, गगनबावडा येथे इयत्ता 6 वी ते 10 वी या वर्गामध्ये मोफत प्रवेश सुरु झाल्याचे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक जे.के. परेरा यांनी कळविले आहे.
ही शाळा सर्व सोयीनियुक्त सुसज्ज डिजिटल शाळा असून प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅब देण्यात येणार आहेत. शाळेमध्ये निवासी व भोजनाची सोय असून शैक्षणिक साहित्यासह अन्य सुविधाही मोफत देण्यात येणार आहेत. शाळेची इमारत स्वच्छ व सुसज्ज वातावरणात असून स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय सुविधा तसेच क्रीडांगण उपलब्ध आहे. या शाळेत विविध खेळ व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. शाळेत 80 टक्के प्रवेश अनुसूचित जातीसाठी व 20 टक्के प्रवेश इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. प्रवेशासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. परेरा यांना 9403357043 या क्रमांकावर संपर्क साधावा.