
no images were found
राजर्षी छ.शाहू महाराजांच्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन
कोल्हापूर ता. 26 – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजर्षी छ.शाहू महाराजांच्या जीवनपटाचे तसेच कार्याचे कथन करणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे एक दिवसीय प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. हे प्रदर्शन महापालिका व पुरातत्व विभागाच्यावतीने प्रदर्शित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने छ.शाहू महाराजांचे दत्तक विधान, महाराजांचे राज्यारोहन, शाहू कालीन पत्र व्यवहार, शाहू महाराजांनी अस्पृश समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य, छ.शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला व क्रिडा, प्रशासकीय आदेश, विविध क्षेत्रातील कार्य तसेच महाराजांनी राज्यकारभार करताना वेळोवेळी दिलेले निर्णय याची महत्त्वाची निवडक कागदपत्रे प्रदर्शित केली आहे. त्याचबरोबर शाहू कालीन दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, सहा.संचालक पुरालेखागार दिपाली दिवटे, मोडीज्ञाद सहाय्यक बाजीराव वाडकर, गणेश खाडके, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव उपस्थित होते.