
no images were found
हो, मीच सिद्धू मुसेवालाचा खून केला सलमान खान अजूनही टार्गेटवर
भारतासाठी मोस्ट वॉन्डेट असलेल्या गँगस्टर सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बरार यानं सांगितलंय की सलमान खान अजूनही त्यांच्या टार्गेटवर आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसावाला याची हत्या आपणच केल्याची कबुली गोल्डी ब्रार याने दिली आहे. सलामान खान आपले पुढील टार्गेट असून संधी मिळाल्यास त्यालाही नक्कीच उडवू, असेही तो म्हणाले. आम्ही प्रयत्न करत राहू आणि आम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला कळेल, असेही तो म्हणाला.
हिंदुस्थानसह कॅनडाच्या पोलिसांनीही त्याला वॉन्टेड लिस्टमध्ये टाकले आहे. त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे बक्षिस आहे. याच गोल्डी ब्रार याने ‘आज तक’ला दिलेल्या ‘एक्सक्लुजीव्ह’ मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत.
यादरम्यान गोल्डी ब्रार याने आपण खलिस्तानचे पुरस्कर्ते नसल्याचेही म्हटले. तसेच आयएसआय आणि खलिस्तानसोबत आपली मैत्री नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून गोल्डी ब्रार याने कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम यांच्याशी हातमिळवणी केल्याची चर्चा सुरू आहे. यावरही गोल्डी ब्रार याने स्पष्टीकरण दिले. ज्या लोकांनी आमच्या देशात बॉम्ब हल्ले केले त्यांच्यासोबत आपले कोणतेही संबंध नाही, असे गोल्डीने स्पष्ट केले. मात्र पाकिस्तानमधील दहशतवादी हरविंदर सिंग रिदायासोबत आपला संवाद झाल्याचे त्याने मान्य केले.