no images were found
व्हॉट्सअप मेसेजवरून मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी
मुंबई : पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी व्हॉट्सअप मेसेजवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्यात भारतात असलेल्या 6 जणाची मदत घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे.
मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आला आहे. हा संदेश पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण ६ जण हा हल्ला करणार असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. यासंदर्भातला तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसातील सूत्रांनी दिल्याचं ट्वीट एएनआयनं केलं आहे.
या दहशतवादी धमकीने मुंबईसह देशाचं टेन्शन वाढवले आहे. मुंबईला उडवून देण्याची धमकी पाकिस्तानातून आली आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला ही धमकी आली आहे. तर काल काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या हवाला एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या मोहम्मद यासीन याला अटक केली आहे. तर त्याआधी रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी बेवारस बोटीत घातक शस्त्रास्त्र सापडली होती. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोटीचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे.