no images were found
गेल्या 9 वर्षांत भ्रष्टाचार विरहित काम झालेलं आहे :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये
कोल्हापूर : समाजातल्या प्रत्येक घटकाला योजनेचा लाभ मिळाला आहे. तसंच भ्रष्टाचार विरहित काम झालेलं आहे.महागाईचा निर्देशांकही कमी झालेला आहे. (एका वाक्यात सांगायचं झालं तर) ही 9 वर्षं म्हणजे शासनाचं सुशासन करण्याचा यशस्वी प्रयत्न असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
अमेरिकेत मोदी यांचा जयजयकार झाला.जगामध्ये सर्व राष्ट्रांकडून अत्यंत आदरानं पाहिलं जाते. जागतिक पातळीवर देशाची मान उंचावणारं हे काम होतं आहे, असं ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने महाजनसंपर्क अभियान सुरु केलं असून मोदी@9 चे माहत्व लोकांपर्यंत पोहचवत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
विरोधक यांच्याकडे टीका करण्याचा कोणताच मुद्दा नाही.काँग्रेसला ना गणित कळतं ना कोणता अभ्यास कळतो. काँग्रेसकडेही आता कोणते मुद्देच नाहीत, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.
मणिपूर स्थानिक प्रश्न खुप वर्षांपासूनचे आहेत.त्यावर सुद्धा मार्ग निघेल.शरद पवार बिहारला गेले मात्र मणिपूरच्या प्रश्नवर घेतलेल्या बैठकीसाठी ते आले नाहीत, असंही उपाध्ये यांनी यावेळी सांगितलं.
एखाद्या गोष्टीत त्रुटी राहिली असेल तर त्या संदर्भात सांगणं काही हरकत नाही.सर्व पक्ष कौटुंबिक आहेत, असं लव जिहाद वरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं
केरळ मध्ये डावे आणि काँग्रेस मध्ये कसे येऊ शकतात.कोणी कोणाची बी टीम आहेत याचं स्पष्टीकरण करावं, अशी मागणीही त्यांनी केली.