no images were found
राजर्षी छ.शाहू महाराज समाधीस्थळाच्या दुस-या टप्यातील कामाचा पालकमंत्री दिपक केसरकर व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाच्या दुस-या टप्यातील कामाचा आज कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील, श्रीमती जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे,जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता नारायण भोसले, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव,विरेंद्र मंडलीक, माजी नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, राहुल चिकोडे, व शाहूप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 सिध्दार्थनगर परिसरातील नर्सरी बाग या जागेत पहिल्या टप्यात महापालिकेने राजर्षी छ.शाहू महाराज यांची समाधी बांधली आहे. यामध्ये राजर्षी छ.शाहू महाराज यांचे समाधी स्मारकावरील मेघडंबरी, समाधी परिसराभोवती संरक्षक भिंत, लॅण्डस्केपिंग व विद्युतीकरण ही कामे करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेने स्वनिधीमधून रु.2,76,23,314/- इतका निधी खर्च केला आहे. दुस-या टप्यामध्ये डॉ.बाबासाहे आंबेडकर सभागृह नुतनीकरण व त्यामध्ये राजर्षी छ.शाहू महाराज यांचे जीवनावर कलादालनाची निर्मिती करणे, समाधी स्थळाला संरक्षक भिंत बांधणे, पादचारी मार्ग करणे, लॅण्डस्केपिंग करणे, स्वच्छतागृहाची सुविधा, वाहनताळाची सुविधा, या परिसरातील ऐतिहासीक समाधी वास्तूंचे संवर्धन, दुरुस्ती व डागडुजी करणे व विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून रक्कम रु.9,40,56,108/- इतका निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे.