Home शासकीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या सुशोभिकरण कामाच्या स्थगितीचे निर्देश नाहीत   -सहाय्यक आयुक्त साळे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या सुशोभिकरण कामाच्या स्थगितीचे निर्देश नाहीत   -सहाय्यक आयुक्त साळे

0 second read
0
0
101

no images were found

राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या सुशोभिकरण

कामाच्या स्थगितीचे निर्देश नाहीत   –सहाय्यक आयुक्त साळे

     कोल्हापूर :   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत महानगरपालिका हद्दीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभिकरण व इतर कामे करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 28 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये 9 कोटी 40 लाख 56 हजार 108 इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च सन 2022-23 या  चालू वर्षासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यात यावा, असे निर्देशित केले असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी कळविले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाच्या कामास स्थगिती अथवा काम थांबविण्यात यावे, याबाबत शासन स्तरावरुन कोणतेही निर्देश सहायक आयुक्त , समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयास प्राप्त नाहीत, असेही त्यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…