Home सामाजिक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महानगरपालिकातर्फे विविध कार्यक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महानगरपालिकातर्फे विविध कार्यक्रम

0 second read
0
0
123

no images were found

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महानगरपालिकातर्फे विविध कार्यक्रम

          कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी महानगरपालिकामार्फत 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे.

अमृत महोत्सवाच्या उपक्रमानिमित्त शाळांमध्ये विविध  स्पर्धा, बचत गट मिळावे, व्याख्यानमाला, स्वच्छता मोहीम याबरोबरच स्वातंत्र्य सेनानी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या महानगरपालिकेच्या वतीने भेटी  घेण्यात येणार आहेत. या महोत्सवाबाबत  विशेष संदेश देणारी चित्रे सुद्धा केएमटी बसेच्या माध्यमातून प्रसिध्द केले जाणार आहेत.  13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत महानगरपालिकेने 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे.  यामध्ये विविध संघटनांनी पुढाकार घेतलेला असून विविध संस्था व  कर्मचारी त्यांच्या घरावर तिरंगा लावणार आहेत, अशी माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली. बचतगटाच्या मध्यमातून शहरात तिरंगा राखी स्टॉलच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली आहे. नागरिकांनी घरोघरी तिरंगा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा तसेच सामाजिक संस्थानी त्यांच्याकडील नाविन्यपुर्ण संकल्पना महापालिकेस सुचवाव्यात या संकल्पनांचा या अभियानात समावेश केला जाईल तसेच  महापालिका हद्दीतील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहनही डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा कोल्हापूर:भारतीय जनता पार्टी …