
no images were found
सौराष्ट्र-महाराष्ट्र संबंध सौहार्दपूर्ण – शाहू महाराज
पालिताना : येथे जैन श्वेतांबर समाजाने उभारलेल्या कोल्हापूर भवनमुळे सौराष्ट्र-महाराष्ट्र सौहार्दपूर्ण होऊन ते वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी आज केले.
जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र असलेल्या पालिताना येथे कोल्हापूर येथील जैन श्वेतांबर ट्रस्टच्या वतीने श्री कोल्हापूर भवन उभारण्यात आले आले आहे. त्यानिमित्त अंजन शलाका महोत्सव आयोजित केला होता. यावेळी धर्मशाळेच्या उद्घाटनानंतर शाहू महाराज बोलत होते. येथे भेट देणाऱ्या भक्तांसाठी 80 हजार फूट जागेवर सुसज्ज अशा धर्मशाळेची सर्वांच्या सहयोगातून उभारणी केली आहे. यामध्ये भगवान आदिनाथांचे संगमरवरी मंदिर, 56 खोल्या, चार व्हिलाज, उपाश्रय, भोजनशाळा, अशा सुविधा आहेत.
पुढील महिन्यापासून भक्तांना धर्मशाळा उपलब्ध होईल. याचे उदघाटन श्रीमंत शाहू महाराज,भावनगरचे महाराज विजयसिंह, महाराणी, मधुरिमाराजे व सोनमल वरदाजी निंबजिया परिवाराच्या हस्ते झाले. यावेळी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी भावनगरचे राजे विजयसिंह महाराज यांनी आठवणींना उजाळा देत दोन्ही संस्थानचे स्पष्ट करून भाऊसिंगजी रोडला आपल्या आजोबांचे नाव असल्याचे सांगितले. सौभाग्यवती मधुरिमाराजे यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर आचार्य श्री रत्नाकर सुरीश्वरजी महाराज, श्री राजशेखर सुरीश्वरजी महाराज, ट्रस्टचे उपाध्यक्ष कुमार राठोड, सचिव हिम्मत राठोड, खजानिस नरेंद्र बाफना, इतर पदाधिकारी, चंद्रिका ओसवाल आदी उपस्थित होते. स्वर्गीय पद्मावतीबेन मोतीजी सुराणा परिवाराला ध्वजाचा मान मिळाला.
असाही योगायोग
धर्मशाळेचे उदघाटन आणि भरत ओसवाल यांचा वाढदिवस असा अभूतपूर्व योगायोग आज जुळून आला. त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत भरत ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर येथील दीपक ओसवाल यांच्या आर्ट अँड आयडिया कंपनीने गेल्या महिनाभरापासून परिश्रम घेऊन आठ दिवस चाललेल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले.