no images were found
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप-खंडण’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन
काही दिवसांपूर्वी बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन त्यात जवळपास 300 प्रवाशांचा मृत्यू झाला. बालासोरच्या आधी 31 मार्चला दिल्लीतील शाहीन बाग येथील शाहरूख सैफी या जिहाद्याने केरळमध्ये जाऊन ‘अलप्पुळा-कन्नूर एक्सप्रेस’मध्ये पेट्रोलसारखा घातक ज्वलनशील पदार्थ टाकून 3 प्रवाशांना जाळून ठार मारले, तर त्या घटनेत 9 जण गंभीर जखमी झाले. शाहरूख सैफी हा भारतात बंदी घातलेल्या झाकीर नाईकचा अनुयायी आहे. त्यानंतर 1 जून रोजी त्याच रेल्वेत पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. केरळमधील कन्नूर स्थानकात बोगीला आग लावण्यात आली. ती बोगी भारत पेट्रोलियमच्या इंधन टाक्यांजवळ होती. याला म्हणतात ‘गजवा-ए-हिंद’, हाच ‘रेल जिहाद’ आहे. जेव्हापासून भारतात ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालू झाली, तेव्हापासून तिच्यावर देशभरात ठिकठिकाणी दगडफेक होत आहे. हल्ल्याची पद्धतही एकसमान आहे. ‘वंदे भारत’विषयी इतका तिरस्कार का? ‘वंदे मातरम्’चा द्वेष करणारेच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर हल्ले करत आहेत, हा ‘रेल जिहाद’ नव्हे का ? असा प्रश्न दिल्ली येथील संरक्षण विशेषतज्ञ कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी उपस्थित केला. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘रेल जिहाद’ या विषयावर बोलतांना केले.
या प्रसंगी छत्तीसगड येथील पू. श्री रामबालकदासजी महात्यागी महाराज यांच्या शुभहस्ते मराठी आणि हिंदी भाषेतील ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप-खंडण’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.