
no images were found
परततोय लावणीचा महामंच “ढोलकीच्या तालावर” कलर्स मराठीवर
कला आणि संस्कृतीचं माहेर घर म्हणजे महाराष्ट्र. विविध कला, संस्कृती आणि साहित्याचा देदीप्यमान वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राच्या नृत्यकलेची ओळख आणि लोकसंस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे “लावणी”. मोठ्या डौलाने लावणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नृत्यशैलीला प्रेक्षकांसमोर अनेक वर्षे यशस्वीरीत्या सादर केले आहे. तसेच ज्या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये प्रेक्षकांना नेहेमीच लावणी ही नृत्यशैली नाविन्यपूर्ण ढंगात बघायला मिळाली तो कार्यक्रम म्हणजे ‘ढोलकीच्या तालावर’. लावणीचा महामंच परततोय एक नव्या बहारदार पर्वासोबत. सज्ज होतोय लावणीचा महामंच, जिथे थिरकणार आहेत महाराष्ट्रातील आजच्या लावण्यवती. जिथे रंगणार आहे जंगी मुकाबला आणि त्यातूनच महाराष्ट्राला मिळणार आजची लावणी सम्राज्ञी. या पर्वाचे परीक्षक असणार आहेत, अष्टपैलू अभिनेत्री क्रांती रेडकर, सुप्रसिध्द निर्माते, दिगदर्शक आणि लेखक अभिजीत पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे बिग बॉस मराठी सिझन चौथाचा महविजेता आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षय केळकर. तेंव्हा नक्की बघा ‘ढोलकीच्या तालावर’ १ जुलै पासून शनि आणि रवि रात्री ९.०० वा फक्त कलर्स मराठीवर.
लावणी म्हणजे अदाकारी, नृत्य आणि ताल यांचा त्रिवेणी संगम. याबद्दल उत्तम जाण असणाऱ्या, आपल्या लावणी आणि अदाकारीने परीक्षकांचे मन जिंकलेल्या प्रतिभावान स्पर्धक येत आहेत आपले मन जिंकायला. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून असंख्य मुलींनी आपल्या लावणीचे व्हिडिओ पाठवले, ज्यामधून काही निवडक मुलींनाच या पर्वामध्ये आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आम्ही सज्ज आहोत, मंच सज्ज आहे तुमच्या भेटीला.