Home क्राईम संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पण चौकशीदरम्यान नवा ट्विस्ट

संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पण चौकशीदरम्यान नवा ट्विस्ट

0 second read
0
0
33

no images were found

संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पण चौकशीदरम्यान नवा ट्विस्ट

मुंबई: काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सरकारविरोधात बोलणं थांबवा अन्यथा गोळ्या घालू, मला वारंवार धमक्या येतायत, अशी तक्रार संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना धमकीचा कॉल आला होता. संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला लाव. त्याला कॉल उचलायला सांग. संजय राऊत आणि तुला (सुनील राऊत) गोळ्या घालणार आणि एका महिन्याच्या आत दोघांना स्मशानात पाठवणार”, अशी धमकी कॉलवरून देण्यात आली होती. आरोपीने शिवीगाळही केली होती.
यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले आहे. या व्यक्तीचे नाव मयूर शिंदे असे आहे. मयूर शिंदे याच्या चौकशीदरम्यान विरोधकांकडून एक वेगळाच आरोप केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे.

संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेतल्याने त्यांना पुन्हा सुरक्षा मिळावी या हेतूने मयुर शिंदे यांनी हा धमकीचा बनाव केल्याची प्राथमिक माहिती आहे. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा सोबत त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती देखील समोर येत आहे. संजय राऊत यांनी स्वत:देखील हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. ही सुरक्षा परत मिळवण्यासाठी संजय राऊत यांनीच हा एक बनाव केल्याचा दावा देखील विरोधकांकडून केला जात आहे.या ट्विस्टमुळे पोलिसांसमोरी आव्हान वाढले आहे. तसेच मयूर शिंदे यांनी संजय राऊत यांना धमकी का दिली, याबद्दल संभ्रम आणखीनच वाढला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…